अखेर बारावीचा निकाल जाहीर ; या तारखेला होईल निकाल



महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary Education) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. आता निकालाविषयी मोठी बातमी समोर आली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करू, असं सांगितलं होतं. आता बारावी परीक्षेचे पेपर तपासणीचं कामही व्यवस्थितपणे पार पडल्याची माहीती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावीं यांनी दिली आहे. याशिवाय आता मिळालेल्या माहीतीनुसार, बारावीचा निकाल उद्या (ता. 8 जून) जाहीर होण्याची शक्यता आहे.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ द्वारे सांगितलेल्या माहितीच्या आधारे बारावीचा निकाल उद्या जाहीर होईल. उद्या 8 जून रोजी दुपारी एक वाजता 12 वी चा निकाल लागणार (Maharashtra 12th Result 2022) आहे.

 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील वेबसाइट च्या माध्यमातून पाहू शकता .


 विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षेवेळी वापरलेला रोल नंबर आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव अशी माहीती आवश्यक असणार आहे.
 ऑनलाईन पद्धतीनं इंटरनेटवर निकाल पाहिला की प्रिंट आऊट नक्की घ्यावे.
हि बातमी नक्की महत्वाची आहे इतरांना देखील शेअर करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या