नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही C-60 Force Information In Marathi बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. C-60 Police Force ही भारतातील एकमेव Force आहे जी जिल्हा स्तरावर तयार केली आहे. ही नक्षलवाद्यांना ( naxal ) तोंड देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायामधे वाढ झाली म्हणून नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी दिनांक ०१/१२/१९९० साली श्री. के. पी. रघुवंशी ( पोलिस अधीक्षक , गडचिरोली ) यांनी सी-60 ची स्थापना केली. तेव्हा सी -60 मधे फक्त 60 सक्षम व विशेष कमांडो ची नेमणूक करण्यात आली व पोलिस निरीक्षक श्री. ए. व्ही. गुजर हे सी-60 चे पहिले प्रभारी अधिकारी होते. आणि (C 60 पोलीस फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते) आहे ? C 60 force चे ब्रीद वाक्य वीर भोग्या वसुंधरा हे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोलीला दोन विभागात विभाजन केले ( उत्तर विभाग व दक्षिण विभाग ) दक्षिण भागात नक्षली कारवायावर वाढ झाल्याने प्राणहिता ऊप मुख्यालय येथे मार्च 1994 साली C-60 चे दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली.
C-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे . सी 60 पथक हे नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. सी 60 पथकाला यापूर्वी ( क्र्याक कमांडो ) या नावाने सुध्दा ओळखले जात होते. C60 Force information in marathi
C -60 पथक अशा पद्धतीने करतात कारवाई
प्रशिक्षित सी-60 येथील कठोर जवान परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पहाडी व आणि अति दुर्गम भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान राबवितात दरम्यान चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आत्मसमर्पण बाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यात त्यांचे मन परिवर्तन करून लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात परंतु कट्टर नक्षल शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करून अशिक्षित लोकांना शासनाविरुद्ध भडकवतात अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जातो.
C-60 जवानांचा जनतेशी संवाद व त्यांच्या समस्या
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अतिदुर्गम व जंगल भागात कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जात नाही अशा गावात C-60 पथके जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात ( जसे - वीज,रस्ते,तलाव , बोअरवेल , आरोग्य, शाळा , बससेवा ) यातील काही समस्या आढळल्यास मुख्यालय येथे येऊन वरिष्ठ अधिकारी यांना सांगून वरिष्ठ अधिकारी शासकीय विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. C-60 जवान हे जास्त तर गडचिरोली जिल्ह्यातील असतात त्यातील भाषा व जंगलाची माहिती साठी त्यांची नेमणूक केली जाते. महाराष्ट्र कमांडो फोर्स
खेळ व व्यायाम
C60 फॉर्स मुख्यालय येथे रिझर्व असताना शारीरिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी दररोज सकाळी शारीरिक व्यायाम कवायत व
सांघिक खेळ खेळले जातात तसेच त्यांना नक्षलविरोधी अभियान राबविणे करिता वेळोवेळी नक्षल टॅक्टिस बद्दलची माहिती दिली जाते तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर किंवा कमांडो मूव्हीज दाखविण्यात येते. C 60 Force information in marathi
C-60 फोर्स प्रशिक्षण ( C-60 Force Training )
राज्य पोलीस दलातील चाणाक्ष व चपळ पोलिसांना शोधून या फोर्स मधे सामील केल्या जाते. C - 60 फोर्स चे ट्रेनिंग हे सर्वसामान्य पोलिसानं पेक्षा वेगळी असते. C60 फोर्स अतिदुर्गम संवेदनशील व पहाडी भागात ऊन वारा पाऊस दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्यांना उच्च विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी ( ग्रे हाऊंनस हैद्राबाद , एन एस जी मनेसर ,हरियाणा हजारीबाग , कांकेर , यु.ओ.टी.सी ) नागपूर येथे पाठविल्या जाते.
या फोर्स मधे अगोदर 60 जवानांना सामील केले होते त्यामुळे याला (C-60 Full Form ) Comando-60 असे नाव ठेवले परंतु या फोर्स मधे आता हजारो जवान सामील आहेत तरीही मात्र याच नाव C-60 फोर्सच आहे. या फोर्स मधे असलेल्या जवानांना आपली ओळख कुठेही उघड करता येत नाही कारण या तुकडीत सहभागी असणाऱ्या जवानांच्या कुटुंबाला मोठा धोका असतो.
C60 force Wikipedia

3 टिप्पण्या
अतिशय सुंदर माहिती दिलीत..
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! सर
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.