बँक ऑफ महाराष्ट्र : असे अर्ज करा चेक बुक साठी

How can I get cheque book from Bank of Maharashtra?  मी बँक ऑफ महाराष्ट्र मधून चेक बुक कसे मिळवू शकतो?     या आर्टिकल मध्ये तुम्हाला याच बद्दल माहिती सांगणार आहोत निश्चित तुम्ही घरबसल्या चेक बुक मागवू शकता.
आपल्याला मोठा व्यवहार करण्याकरिता चेक बुक ची आवश्यकता पडते.मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्र २०,००० रुपया पेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी चेक बुक ची मागणी करत आहेत.
तर  Can I get cheque book online? मला चेक बुक ऑनलाईन मिळेल का? होय तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन cheque book साठी apply करू शकता.
अगोदर बँक ऑफ महाराष्ट्र च्या मोबाईल बँकिंग ने तुम्ही Apply करू शकत होते परंतु ते थोडा करण्यासाठी तुम्हाला APPLICATION DOWNLOAD करून त्यात अकाऊंट नंबर व इतर माहिती भरून करावे लागत होते.
Bank of Maharashtra ग्राहकाच्या सुविधेसाठी  दिनांक ३० डिसेंबर २०२१ ला WhatsApp banking लाँच केले .

बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी अतिरिक्त सेवा वितरण चॅनेल म्हणून "WhatsApp बँकिंग" सेवा सुरू केली आहे. बँकेचे गैर-ग्राहक देखील या सेवांचा लाभ घेऊ शकतात. संवाद साधण्यासाठी तुम्हाला Bank of Maharashtra cheque book request Number? 70660 36640 वर "Hi" पाठवा. व्हॉट्सअॅप बँकिंगसह, बँक रीअल-टाइम खाते शिल्लक चौकशी, मिनी-स्टेटमेंट, चेक बुक विनंती, चेक स्टेटसची चौकशी, बँकेचे एटीएमएस आणि शाखा शोधणे, निवड करणे, निवड रद्द करणे, याच पद्धतीने तुम्ही चेक बुक साठी देखील विनंती करू शकता.
आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने step by step cheque book कसे मागवू शकता याच्या बद्दल सांगणार आहोत.
 
 
 
 
  •  सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये 7066036640 हा नंबर सेव्ह करा.
  • WhatsApp वर जाऊन सेव्ह केलेल्या नंबर वर Hi असा SMS पाठवा .( बँकेत नोंदणी असलेल्या मोबाईल नंबर वरून )
  • Hi SMS केल्यानंतर BOM  कडून रिप्लाय येईल त्यात Menu वर क्लिक करा.
  • Bank Account वर क्लिक करा.
  • परत एक एसएमएस येईल Select वर क्लिक करून Request Cheque book पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या अकाऊंट चे आखरी चे ४ अंक टाका.

तुमचा अर्ज विनंती घेतली जाईल व तुम्हाला काही दिवसात आपल्या घरच्या पत्यावर चेक बुक पाठवल्या जाईल.

How to know the tracking number of cheque book ? चेक बुकचा ट्रॅकिंग नंबर कसा जाणून घ्यावा? तुम्ही जेव्हा cheque book साठी विनंती करता त्याच्या काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एसएमएस द्वारे पाठवल्या जाईल व तुम्ही आपला cheque book चा Status पाहू शकणार.


माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.आमच्या वेबसाईट वर नवनवीन माहिती आम्ही देत असतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या