आपले दुकान, घर, कार्यालय , गूगल मॅप वर जोडायला शिका

 

How-to-add-business-location-in-google-map




   Google Map तर सर्वांना माहिती आहे आपण Google map चा वापर आपण एखादे  दुकान , कार्यालय,गाव हे काही शोधण्यासाठी करतो आणि Google Map द्वारे आपल्याला सर्व नकाशा आपल्या मोबाईल वर दिसतो.  आपल्याला कुठेच भडकत राहायची गरज पडत नाही .आपल्या मोबाईल वरुन आपण पत्ता शोधू शकतो. Map Var Aaple business location kase jodayche?  प्रत्येकाला हे टाकता येत नाही त्यासाठी आम्ही हा लेख लिहला आहे की तुम्ही पण आपले दुकान, घर,गाव, कार्यालय इत्यादी आपल्या मोबाईल वरून  जोडू शकाल. How to add business location in Google map ?  

 

 

     मित्रांनो Google map वर जर तुम्ही आपले दुकान,घर,गाव,मंदिर, बँक,शाळा, कार्यालय खूप काही जोडायचे असेल तर जोडू  शकता कारण याच्या द्वारे लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती होण्यास मदत होते त्यांना भटकत राहावे लागणार नाही ते सहजरित्या आपल्या मोबाईल वरुन Google map वर जाऊन तुमचे दुकान शोधू शकतात. याच्यामुळे आपल्या दुकानाचे पण मोफत प्रचार होईल  कारण ते लोकांना मॅप वर दिसत राहील.   आपल्याला काही प्रक्रिया  फॉलो कराव्या लागतील . तूम्ही गुगल मॅप वर आपला पत्ता जोडताना शक्यतो आपण त्याच पत्यावरून सर्व प्रक्रिया करा जेणे करून तुमचा पत्ता सहजरित्या होऊन जाईल.सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गूगल तुम्हाला एक पोस्टाद्वारे कोड पाठवतो तो कोड टाकून तुम्हाला Verify करावे लागते की जो पत्ता तुम्ही टाकला आहे तो तुमचाच आहे. 

एकदा तुम्ही Verify केले की तुमचे दुकान किंवा कार्यालय Google Map वर दिसायला लागेल.तुम्ही आपल्या दुकानाचा वेळ व इतर फोटो मोबाईल नंबर आपल्या प्रोफाइल वर टाकता येईल.

  तर चला जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया :    

1.आपल्या मोबाईल चे लोकेशन सुरू करून ठेवा. 

 

 

2. Play Store वरून Google My Business ही ॲप डाऊनोड करा. 👇       

 


 

 3. Google My Business ही ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन करा.   खाली दिल्या प्रमाणे फॉर्म ओपन होईल Business Name  मध्ये तुमच्या दुकान, हॉटेल,घर,कार्यालय तुमचा जो business आहे त्याचे नाव टाका. त्यानंतर आपल्या business ची Category टाका. जसे तुमचे दुकान कोणत्या श्रेणी मध्ये येतो. 






4. तुम्हाला ग्राहक भेट देऊ शकतील असे स्थान जोडू इच्छिता, जसे की दुकान किंवा कार्यालय?  जेव्हा ग्राहक तुमचा व्यवसाय शोधत असतील तेव्हा हे स्थान Google नकाशे आणि शोध वर दर्शविले जाईल असे विचारले आहे तुम्हाला Yes करून Next करायचा आहे






5. What's Address वर तुम्हाला तुमच्या दुकान,कार्यालय किंवा घराचा पत्ता द्यायचा आहे जिथं तुमचा दुकान , कार्यालय, घर असेल. Next 👉

 

 

 




6.Where are you located वर तुम्हाला तुमच्या दुकान, कार्यालय,घराचा जो पत्ता आहे त्याला पॉइंट करावे लागेल त्या साठी तुमचा location सुरू असायला पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया करताना तुम्ही शक्यतो त्यास location ला असायला पाहिजे तुम्हाला Location पॉइंट करायला अडचण जाणार नाही. Next 👉

 

 


7. Add Contact Info तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, वेबसाईट असेल तर टाकू शकता अथवा सोडून द्या व Skip करा.



8. तुम्ही लोकेशन पॉइंट केल्यानंतर खाली दिल्या प्रमाणे फॉर्म ओपन होईल. तुम्हाला आपले बिझनेस Verify करावे लागेल.आपल्याला एक पोस्टाद्वारे 6 अंकी पिन पाठवल्या जाते ते  तुम्हाला टाकून Verify करायचे असते. त्यासाठी आपला नाव टाकून mail या पर्यायावर क्लिक करा. पिन आपल्याला दोन आठवड्या मध्ये टाकलेल्या लोकेशन वर येईल ते टाकून verify करू शकता.




9. सर्व प्रक्रिया पुर्ण झालेली आहे.तुम्ही आपल्या नुसार प्रोफाइल मध्ये फोटो, आपल्या बिझनेस चा वेळ हे टाकू शकता.अथवा सोडून द्या.

 

 

 

 




वरील सर्व प्रक्रिया तुम्हाला नक्की समजली असेल.आपले दुकान , घर, तूम्ही टाकायला शिकले असाल व तुम्ही इतर आपल्या मित्रांना देखील टाकून देऊन त्यांना मदत करू शकता. 

आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.