दिल्ली : आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार संदर्भात ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
UIDAI ने ट्विटरवर ग्राहकांना खुल्या बाजारातील आधार PVC च्या प्रती न वापरण्याचा इशारा दिला आहे. खुल्या बाजारातून बनवलेल्या आधार पीव्हीसी कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांचा अभाव असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
अनेकांना बाजारातून पीव्हीसी बेस बनवलेला मिळतो
वास्तविक, अनेक लोक UIDAI वेबसाइटवर जाऊन आधारसाठी अर्ज करतात. त्यांचे आधार तयार झाल्यावर ते त्याची PDF प्रत डाऊनलोड करतात.
यानंतर, त्याचे पीव्हीसी कार्ड म्हणजे प्लास्टिकचे आधार कार्ड किंवा बाजारातून बनवलेले स्मार्ट आधार कार्ड मिळवतात.
त्याच्या मध्ये कोणतेही सुरक्षा वैशिष्ट्ये राहत नाहीत.
आता यात अडचण अशी आहे की पीव्हीसी कार्ड बनवण्यासाठी लोक बाजारात पैसे खर्च करतात, पण त्यात सुरक्षा वैशिष्ट्ये नाहीत. अशा आधार क्रमांकाशी छेडछाड होण्याची शक्यता आहे.
या सुरक्षेच्या अभावाचे कारण देत UIDAI ने अलर्ट जारी केला आहे.
आपल्याला PVC आधार कार्ड हवंय तर कसा घर बसल्या मागवू शकता.
असे मागवा घरबसल्या PVC / प्लास्टिक आधार कार्ड जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया:
✔️सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईट वर जहा.
✔️ वेबसाईट ओपन केल्यानंतर order Aadhar PVC Card या वर क्लिक करा.
✔️ परत एकदा Order Aadhar PVC Card यावर क्लिक करा.
✔️ खाली दिल्या प्रमाणे स्क्रीन ओपन होईल. आपला आधार कार्ड नंबर, captcha व आपला मोबाईल नंबर आधार ला लिंक नसेल तर टाकून send Otp या बटनवर
क्लिक करा. ( लिंक असल्यास मोबाईल नंबर टाकायची गरज नाही अथवा टाकता ही येईल )
✔️ त्याच प्रमाणे स्क्रीन दिसेल यांच्यामधे OTP टाकून Terms & Conditions वर टिक करून Submit बटणावर क्लिक करा.
✔️ खाली दिल्या प्रमाणे आपल्याला टिक करून Make Payment या पर्यायावर क्लिक करा
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसात आपल्या पत्यावर आधार कार्ड by post येईल.
ही बातमी खूप महत्वाची आहे इतरांना देखील नक्की शेअर करा.


0 टिप्पण्या
धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.