या सुविधेच्या माध्यमातून युजर्सना छोटी रक्कम सहज पाठवता येइल.आर बी आय ने डिजिटल पेमेंटसाठी 24×7 हेल्पलाईन डिजिसाथीला सुध्दा लाँच केले आहे.स्मार्टफोन च्या तुलनेत फीचर फोन मध्ये कमी फीचर्स मिळतात. फीचर फोनचा वापर फक्त टेक्स्ट मेसेज आणि कॉल करण्यासाठी केला जातो.पण आता फीचर फोन युजर्स आणि स्मार्टफोन युजर्स सुध्दा विना इंटरनेट पेमेंट करू शकतील.आर बी आय चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, फीचर फोन युजर्स साठी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा खूपच महत्त्वाचे आहे.फीचर फोन युजर्स विना इंटरनेट डिजिटल पेमेंट करू शकतील यासाठी इंटरनेट ची सुध्दा गरज पडणार नाही.
प्रत्येकाकडे स्मार्टफोन नाही खूप सारे लोक फीचर फोन सुध्दा वापरतात. काही काही दिवसापूर्वीच *99# ही सेवा सर्व मोबाईल युजर्स साठी सुरू केली आहे. ही सुविधा स्मार्टफोन आणि फीचर फोन च्या सर्व मॉडेल्स ला सपोर्ट करते. तसेच UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. या सुविधेचा फायदा तुम्ही इंटरनेट नसतांना देखील डिजिटल पेमेंट करू शकता.
UPI ने विना इंटरनेट पेमेंट करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल वरुन *99# dial करावे लागते.आणि नंतर आपल्या खाते क्रमांक UPI Pin बनवून पेमेंट करता येईल.

0 टिप्पण्या
धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.