माझी आई" निबंध मराठी

 मित्रांनो आज आपण माझी आई वर निबंध  सांगणार आहोत.आई वर निबंध सांगायची गरज पण नाहीये कारण आई म्हंटल्यावर सर्वांना आईवर लिहू शकता येते परंतु आपण निबंध लिहितांना चांगल्या शब्दा मध्ये लिहले पाहिजे.या निबंधा मधून तुम्ही आयडिया घेऊ शकता की आपण व्यवस्थित चांगल्या शब्दामध्ये कसं लिहायचं तर चला पूर्ण वाचून घ्या. 'My mother Essay In Marathi'

mazi-aai-nibandh



            माझी आई निबंध ( मराठी)

 

 

                   दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो,

             मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, 

                                     आठवते ती फक्त आई.

' आईसारखे दैवत साऱ्या जगातावर नाही ' हे गाणे लागले होते. ऐकत असताना मी आईकडेच पाहत होतो . खरेच ! आई हा शब्दच खूप गोड आहे . मला माझी आई सर्वात जास्त आवडते . 

ती दिसते खूप गोड आणि बोलतेही गोड तिचा पोशाख साधाच पण स्वच्छ आणि नीटनेटका असतो . मीसुद्धा कपड्यांबाबत गबाळेपणा केला तर तिला आवडत नाही . 

घरातसुद्धा सर्व वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवलेल्या तिला आवडतात . त्यामुळे आमचे घर कसे छान आवरलेले असते आणि प्रसन्न वाटते . आम्ही उठायच्या आधी ती उठते आणि भराभर सकाळच्या कामांना सुरुवात करते . बाबांचा , दादाचा डबा , त्यांची न्याहारी माझ्यासाठी काहीतरी खाऊ अशी तिची सारी कामे एकाच वेळी चालू असतात . 

त्यानंतर ती माझ्या अभ्यासात मला मदत करते . माझे अक्षर वळणदार व्हावे , मला शुद्ध लिहिता यावे यासाठी ती माझ्याकडून सराव करून घेते . मला चांगले गुण मिळाले की शाबासकी देते अन् आणखी झटून अभ्यास करायला प्रोत्साहन देते . माझी आई स्वभावाने अतिशय प्रेमळ आहे . परंतु आम्ही जर खूप दंगामस्ती केली किंवा अभ्यास छान केला नाही तर मात्र ती खूप रागावते . कधी धम्मकलाडूसुद्धा देते . मी शाळेतून यायच्या वेळी ती दारात उभी असते . आल्या आल्या तिच्या गळ्यात पडायचे अन् तिने केलेला आवडता खाऊ मटकावायचा हा माझा ठरलेला नेम असतो . "Mazi aai nibandh"

माझी आई माझ्यासाठी नवे कपडे आणील , खेळ आणील , आवडीचा खाऊ करील पण ... जर शिस्तीने वागले नाही तर मात्र तिचा पारा चढतो . आम्हांला चांगले वळण लागावे म्हणून ती सतत प्रयत्न करीत असते . अशा या आईला माझ्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . कवींनी आईला ' प्रेमस्वरूप आई , वात्सल्यसिंधू आई ' असे म्हटले आहे . आपल्या ऋषींनी ' मातृदेवो भव ' असे सांगितले आहे . मीही आईला दैवत मानतो , तिला सुखात ठेवणे हे मी माझे कर्तव्य मानतो .

My mother Essay in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या