नमस्कार मित्रांनो ! स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी ला राष्ट्रीय युवा दीन म्हणुन साजरी केली जाते. Swami Vivekanand Mahiti marathi
स्वामी विवेकानंद कोण होते यांच्या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत त्यांच्या जीवनाविषयी संपुर्ण माहिती आणि बरेच काही...
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला व मृत्यू 4 जुलै 1902 मध्ये झाला स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली अध्यात्मिक गुरू होते. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते.
1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म काँग्रेस मध्ये त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनधित्व केले. स्वामी विवेकानंदांच्या वक्तृत्वा मुळे भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोपातील प्रत्येक देशात पोहचला. त्यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली आणि ते अजून कार्यरत आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परहंस यांचे शिष्य होते. " With My American brother's And sister's " हे भाषण उघडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या भाषणातील बोलल्या पहिल्या वाक्यांनी सर्वांची मने जिंकली.
स्वामी विवेकानंद जीवन चरित्र - Swami Vivekananda Biography
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकाता येथे झाला. त्यांच्या बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील होते.त्यांच्या वडिलांचं पश्चात संस्कृतीवर विश्वास होता. 'Swami vivekanda biography' त्यांनाही नरेंद्र यांना ( स्वामी विवेकानंद) इंग्लिश शिकवून पाश्चात सभ्यतेच्या धरतीवर चालवायची होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवीजी या धार्मिक विचाराच्या स्त्री होत्या. त्यांचा बराचसा वेळ भगवान शिवाच्या उपासनेत जात असे. नरेंद ची बुध्दी लहानपणापासूनच तीक्ष्ण होती आणि ईश्वरप्राप्ती तळमळ ही प्रबळ होती. यासाठी ते पहिल्यांदा ' ब्रह्मसमाज ' गेले परंतु त्यांचे मन तृप्त झाले नाही. पाश्चात संस्कृतीत वेदांत आणि योगाचा परिचय करून देण्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण योगदान द्यायचे होते.
विश्वनाथ दत्त ( वडील ) यांचे अपघाती निधन झाले. घरची जिम्मेदारी नरेंद्र वर पडली. त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती.गरिबितही नरेंद हा उत्तम पाहुणा - सेवक होता. तो स्वतः उपाशी रहायचा पण पाहुण्याला खाऊ घालत असायचा. रात्र भर स्वतः पावसात भिजून रहायचा पण पाहुण्याला आपल्या खाटेवर झोपायला द्यायचा.
स्वामी विवेकानंद यांनी आपले जीवन गुरुदेव श्री रामकृष्ण परहंस यांना समर्पित केले होते. गुरुदेवांच्या मृत्युच्या दिवसात कुटुंबाच्या नाजूक परिस्तिथी ची चिंता न करता, स्वतःच्या अन्नाची चिंता न करता , गुरुदेव खूप आजारी होते त्यांच्या सेवेत ते मग्न राहिले.
स्वामी विवेकानंद महान स्वप्न पाहणारे होते.त्यांनी नवीन सामाजची कल्पना केली होती. ज्या समाजात धर्म किंवा जातीच्या आधारावर माणसा माणसात भेद नसतो. वेदांताची तत्वे त्यांनी या स्वरूपात मांडली. अध्यात्मक विरुद्ध भौतिकवाद या वादात न पडता असे म्हणता येईल की स्वामी विवेकानंदांनी समतेच्या तत्वाचा जो आधार दिला.त्याला भक्कम बौद्धिक आधार क्वचितच सापडेल. विवेकानंदांना तरुणांकडून खूप आशा होत्या. या लेखाद्वारे आजच्या तरुणांसाठी सद्गुणी साधूचे चरित्र त्यांच्या समकालीन समाजाच्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वामी विवेकानंदचे बालपण - Swami Vivekanand' Childhood
लहापणापासूनच नरेंद्र खूप हुशार आणि खोडकर असा मुलगा होता. आपल्या सोबतच्या मित्रा सोबत मस्ती करायचा आणि संधी भेटली की आपल्या शिक्षकासोबतही मस्ती करायला चुकत नव्हता. नरेंद्र च्या घरी रोज पुजापाठ होत असायची. धार्मिक स्वभावामुळे आई भुवनेश्वरी देवीला पुराण, रामायण,महाभारत, इत्यादी कथा ऐकण्याची खूप आवड होती.त्यांच्या घरी निवेदक नियमित येत असत. भजन किर्तन ही नेहमी होत असायचा. आई - वडिलांच्या संस्कार आणि धार्मिक वातावरणामुळे लहानपापासूनच देव जाणण्याची आणि प्राप्ती करण्याची तळमळ मुलाच्या मनात दिसत होती. देवाबद्दल जाणून घेण्याच्या आतुरतेने तो कधी कधी असे प्रश्न विचाराचा की निवेदक पंडित सुध्दा गोंधळून जायचे.
शिकागो मध्ये दिलेले भाषण - Speech In Chicago
अमेरिकन भगिनींनो आणि भावांनो, तुम्ही ज्या सौहार्दाने आणि आपुलकीने आमचे स्वागत केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी उभा राहिलो तेव्हा माझे हृदय अवर्णनीय आनंदाने भरते.
जगातील सर्वात जुन्या संन्याशांच्या परंपरेच्या वतीने मी तुमचे आभार मानतो; धर्माच्या मातेच्या वतीने धन्यवाद द्या; आणि सर्व पंथ आणि धर्मातील हिंदूंच्या सर्व वर्गांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.
मी या मंचावरील काही वक्त्यांचेही आभार मानू इच्छितो, ज्यांनी प्राचीच्या प्रतिनिधींचा उल्लेख करताना तुम्हाला सांगितले की, हे लोक विविध देशांमध्ये सहिष्णुतेची भावना पसरवण्याचा अभिमान बाळगू शकतात.
मला अशा धर्माचा अनुयायी असल्याचा अभिमान वाटतो ज्याने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती या दोन्ही गोष्टी शिकवल्या आहेत. आम्ही केवळ सर्व धर्मांप्रती सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही तर सर्व धर्मांना सत्य मानतो.
मला अभिमान आहे की मी अशा देशाचा आहे ज्याने या पृथ्वीवरील सर्व धर्म आणि देशांतील अत्याचारित आणि निर्वासितांना आश्रय दिला आहे. मला तुम्हांला कळवायला अभिमान वाटतो की, आम्ही ज्यूंचे शुद्ध अवशेष आमच्या तळ्यात ठेवले आहेत, ज्यांनी दक्षिण भारतात येऊन आश्रय घेतला त्याच वर्षी रोमन वंशाच्या अत्याचाराने त्यांचे पवित्र मंदिर धूळ खात पडले होते.
मला अशा धर्माचा अनुयायी असल्याचा अभिमान वाटतो, ज्याने महान जरथुस्त्र जातीच्या अवशेषांना आश्रय दिला आहे आणि आजही ते पाळत आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एका स्तोत्राच्या काही ओळी सांगतो, ज्याचे मी लहानपणापासून पाठ करत आलो आहे आणि ज्याचे दररोज लाखो लोक पाठ करतात.
रुचिनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम् । नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ।।
- 'ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्या निरनिराळ्या उगमांतून निघून समुद्राला मिळतात, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा! वेगवेगळ्या आवडीनुसार, वेगवेगळ्या वाकड्या किंवा सरळ मार्गांनी जाणारी माणसे शेवटी तुमच्यात येऊन भेटतात. '
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।।
-'जो माझ्याकडे येतो - कोणत्याही मार्गाने - मी त्याला स्वीकारतो. शेवटी माझ्याकडे येण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतात.'
जातीयवाद, कट्टरता आणि त्यांच्या भयंकर वंशाच्या कट्टरतेने या सुंदर पृथ्वीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. ते पृथ्वीवर हिंसाचाराने भरत आहेत, वारंवार मानवतेच्या रक्ताचा वर्षाव करत आहेत, संस्कृती नष्ट करत आहेत आणि संपूर्ण राष्ट्रांना निराशेच्या उंबरठ्यावर आणत आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर मानवी समाज आजच्यापेक्षा खूप प्रगत झाला असता. पण आता त्यांची वेळ आली आहे, आणि मला आतून आशा आहे की आज सकाळी या संमेलनाच्या सन्मानार्थ जी घंटा वाजवली गेली आहे, ती सर्व धर्मांधता, तलवारीने किंवा लेखणीने होणारा सर्व छळ आणि एकाच ध्येयाकडे जाणारी मानवाची परस्पर कटुता संपवेल.
स्वामी विवेकांदांचे योगदान आणि महत्व -Contribution And Importance of Swami Vivekananda
स्वामी विवेकानंदांनी एकोणचाळीस वर्षांच्या अल्पशा आयुष्यात जे कार्य केले ते पुढील अनेक शतके पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.
वयाच्या तिसाव्या वर्षी, स्वामी विवेकानंदांनी शिकागो, अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले आणि त्याला सार्वत्रिक मान्यता मिळाली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा म्हणाले होते, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्यामध्ये तुम्हाला सर्वकाही सकारात्मक मिळेल, नकारात्मक काहीही नाही.
स्वामी विवकानंदांचे शिक्षण - Swami Vivekananda's Education
स्वामी विवेकानंदानी आपल्या घरीच शिक्षणाला सुरुवात केले. त्यानंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केले.
काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. 1881 साली ते फाइन आर्टची आणि 1884 साली बॅचलर ऑफ आर्ट्स (B.A ) ची परीक्षा उत्तीर्ण केली.
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यु - Death Of Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यु 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले . विवेकानंदांच्या शिष्याच्या सांगितल्या नुसार तो 40 वर्षापेक्षा अधिक जगणार नाही , त्याचबरोबर या महापुरुषाचे अंतिम संस्कार गंगा नदीच्या काठावर करण्यात आले."Swami Vivekananda mahiti"
- वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही.जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक होते. - स्वामी विवेकानंद
- मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे. - स्वामी विवेकानंद
- असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
- स्वामी विवेकानंद
- उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका…….. . - स्वामी विवेकानंद
- स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …. – स्वामी विवेकानंद
- अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. – स्वामी विवेकानंद
- एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा. - स्वामी विवेकानंद
- सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये. - स्वामी विवेकानंद
- बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
- स्वामी विवेकानंद
- शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
- स्वामी विवेकानंद
0 टिप्पण्या
धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.