जागतिक 'महिला' दिन माहिती- International Women's Day Information


 
International-Women's-Day-Information-In-Marathi
 
8 मार्चला जागतिक महिला दिन असतो हे सर्वांनाच माहिती आहे ; परंतु महिला दिन 8 मार्चलाच का केला जातो याचे कारण व इतिहास सुध्दा आपल्याला माहीत असणे  गरजेचे आहे. याच्या साठीच मी हा लेख लिहिला आहे जेणे करुन सर्वांना याच्या बद्दल माहिती व्हावी. खास करून स्त्री वर्गाना माहिती असणे गरजेचे आहे. लेख पूर्ण वाचा. 

 

जागतिक महिला दिनाचा इतिहास

                आज भारतामध्ये प्रौढ  स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क आहे ; पण विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत संपुर्ण अमेरिका आणि युरोपसह जवळजवळ जगभर स्त्रियाला मतदानाचा अधिकार नाकारला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक जळजळीत उदाहरण होते .या अन्याय विरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 'International women's Day Information'


यासाठी 1907 साली स्तुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्या मध्ये क्लारा झेटाकिन  या अतिशय लढाऊ  बाणाच्या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.





8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये स्त्री उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी स्टटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी एतीहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या  निदर्शने केली.दहा तासाचा दिवस आणि  कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्या बरोबरच लिंग,वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरदारपणे केली.



अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.

1990 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या एतीहासिक कामगिरीच्या  स्मरनार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणुन स्विकारावा असा ठराव केला.

 



             भारतात मुंबई येथे पहिला महिला दीन हा 8 मार्च 1943 रोजी साजरा झाला. पुढे 1975 रोजी ' जागतिक महिला वर्ष म्हणुन जाहीर केले.

त्याच्यानंतर जगभर जागतिक महिला दिन साजरा करतात.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या