पुरुषांनी या 4 गोष्टी कुणालाच सांगू नये - आर्य चाणक्य

Chanakya Niti नमस्कार मित्रांनो www.digimarathi.com मध्ये आपले मनापासून स्वागत आहे.
 मंडळी चाणक्य नीती हे चाणक्य यांनी लिहिलेले धोरणात्मक पुस्तक आहे, ज्यामध्ये जीवन आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त सूचना दिल्या आहेत. असे म्हटले जाते की जो कोणी चाणक्याच्या नीतीचे पालन करतो तो आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी राहतो.

 चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या माणसाने इतरांना सांगू नयेत, अशाच 4 गोष्टी बद्दल आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत त्यासाठी लेख पूर्ण वाचा.



✅   पैशाचे नुकसान
 स्वत:चे आर्थिक नुकसान कोणालाही सांगू नये, जर कोणी असं सांगत असेल तर त्याला कधी पैशाची गरज पडल्यास लोक त्यांना पैसे देण्यास घाबरतात कारण जर याला पैसे दिले तर परत करेल की नाही असा त्यांना वाटतो. आपल्याकडे जेव्हा पैसे नसतात न तेव्हा कोणीच मदत करत नाही आणि पैसे असले की लोक आपोआप तुमच्याकडे येतील. मित्रांनो लोक गरीबाची मदत करण्यास कधीच पुढे येत नाही. म्हणुन अशा गोष्टी कधीच सांगू नये असे चाणक्य सांगतात.


✅    स्वतःचे दुःख 
 मित्रांनो चाणक्य म्हणतात की आपल्यावर असलेले दुःख कुणालाही सांगू नका.कारण लोकांना तेच पाहिजे असते की कशी कुणाची खिल्ली उडव्हायची तुम्ही लोकांना गमतीचा कारण बनू शकता ते तुम्हाला दुःखातून बाहेर यायचा कधीच नाही सांगणार तुमची खिल्लीच उडवणार पण दुःख कुणालाच नाही सांगायचे का ? तुम्ही आपल्या घरच्या आणि जवळच्या मित्रांसोबत दुःख असल्यास सांगू शकता ते तुम्हाला मार्ग काढण्यास मदत करू शकतात.



✅     पत्नीचा चरित्र
आपल्या पत्नीचा चरित्रावर चुकूनही बाहेर बोलू नये.आपल्या घरी होत असलेले भांडण आणि काही पत्नीच्या चुका कधीच सांगू नये.कारण एकाला सांगलेली गोष्ट हे पूर्ण गाव भर पसरत असते एका कडून दुसऱ्या कडे दुसऱ्या कडून तिसऱ्या कडे आपल्या पत्नी बद्दल वाईट गोष्टी पसरत गेल्या तर ते आपल्या साठी हानिकारक होऊ शकते म्हणून अशा गोष्टी गुप्तच ठेवाव्या.


✅   मूर्खा कडून झालेला अपमान 
मित्रांनो जर तुमचा अपमान कोणता मूर्ख माणूस करत असेल तर अशा गोष्टी आपल्या मित्रांना व इतरांना कधीच सांगू नका. कारण लोकांना तुम्ही चेष्टेचा विषय बनू शकता. 

मित्रांनो या चार गोष्टी न सांगण्याच्या उद्देश एकच की लोकांना तुम्ही चेष्टेचा कारण बनू नये.लोक तुमची खिल्ली उडवू नये हा आहे.कारण प्रत्येक माणसाला त्याचा आत्मसन्मान प्रिय असतो.

आमचे नवनवीन पोस्ट वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा.येथे क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या